पुणे जिल्हा : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश खालकर सनदी लेखापालची परीक्षा उतीर्ण

मंचर – जवळे ता.आंबेगाव येथील शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश संजय खालकर या विद्यार्थ्यांने सीए (सनदी लेखापाल) ची परीक्षा उतीर्ण होण्याची किमया केली असून त्याच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जवळे येथील प्रगतशील शेतकरी संजय सदाशिव खालकर यांचा ऋषिकेश हा मुलगा त्याचे प्राथमिक शिक्षक जवळे गावातील प्राथमिक शाळेत झाले. तर दहावीपर्यंत शिक्षण निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयात झाले. तर बारावी, बी कॉम व एम कॉम हे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आर्ट ऑफ कॉमर्स पुणे या ठिकाणी झाले.
मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश हा २५ व्या वर्षी सीए (सनदी लेखापाल) झाला आहे. “मला हे यश मिळविण्यासाठी माझी आई सुरेखा संजय खालकर, वडील संजय सदाशिव खालकर, भाऊ सौरभ संजय खालकर, चुलते संतोष सदाशिव खालकर आणि कुटुंबीयांकडून नेहमीच सकारात्मक पाठिंबा मिळाला. तर सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराकडून योग्य असे मार्गदर्शन मिळाले.
त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ऋषिकेश याला संपर्क करून त्याचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.





