Shakeel Ahmad : “मी त्यांच्यापेक्षा असुरक्षित नेता कधीच पाहिला नाही” ; राहुल गांधींना काँग्रेसच्याच नेत्याकडून घरचा आहेर
Shakeel Ahmad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांच्या राहुल गांधी यांच्यावरील विधानामुळे राजकीय गोंधळ उडाला आहे.

Shakeel Ahmad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांच्या राहुल गांधी यांच्यावरील विधानामुळे राजकीय गोंधळ उडाला आहे. शकील अहमद यांनी राहुल गांधींना पक्षाचे आभासी अध्यक्ष आणि सर्वात असुरक्षित नेता म्हणून संबोधल आहे.
त्यांनी, “पक्षात जे नेते त्यांच्या विचारसरणीमुळे आणि तळागाळातील लोकांशी असलेल्या संबंधांमुळे मजबूत आहेत, त्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ होतात. म्हणूनच काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना सातत्याने कमकुवत केले आहे. त्यांनी तळागाळातील नेतृत्वाला भरभराटीला येऊ दिले नाही.” असं म्हणत राहुल गांधींवर निशाणा साधलाय.
हेही वाचा : काँग्रेसला मोठा हादरा..! माजी मंत्र्यांनं पक्ष फोडला, एकाचवेळी २४ माजी आमदार अन् ७२ नेते फुटले
तर दुसरीकडं यामुळे भाजपला काँग्रेसवर हल्ला करण्याची संधी मिळालीय. शहजाद पूनावाला म्हणाले की, शकील अहमद यांच्या विधानांमुळे राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचे खरे कामकाज उघड झाले आहे.
त्यांनी म्हटले की, गांधी यांना पक्षात सत्य बोलणाऱ्या नेत्यांबद्दल असुरक्षित आणि अस्वस्थ वाटते. त्यानंतर त्यांनी हळूहळू अशा नेत्यांना बाजूला केले. या असुरक्षिततेमुळे पक्षाच्या अंतर्गत कमकुवतपणा उघड झाला आहे, ज्यामुळे त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.
#WATCH दिल्ली | कांग्रेस के पूर्व नेता डॉ. शकील अहमद के बयान पर भाजपा नेता शहजाद पूनावाला ने कहा, “एक बहुत वरिष्ठ नेता, जो मंत्री भी रह चुके हैं, शकील अहमद कहते हैं कि राहुल गांधी सबसे डरपोक और अपरिपक्व व्यक्ति हैं, और राहुल गांधी को कोई भी ऐसा इंसान पसंद नहीं है जिससे उन्हें बॉस… pic.twitter.com/CllpzWejFO
— ANI_HindiNews (@AHindinews) January 24, 2026
बिहार निवडणुकीचा संदर्भ देताना ते म्हणाले की, हा पराभव मत चोरी किंवा कोणत्याही तांत्रिक समस्यांमुळे झाला नाही, तर अंतर्गत अपयश आणि चुकीच्या तिकिट वाटपामुळे झाला आहे.






