‘शाका लाका बूम बूम’ फेम अभिनेता संजूचा पार पडला साखरपुडा; फोटो केले शेअर

Kinshuk Vaidya Engagement | ९०च्या दशकात ‘शाका लाका बूम बूम’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. लहान मुलांना ही मालिका फार आवडत असे. या मालिकेतील संजू अर्थात अभिनेता किंशुक वैद्यचा आणि त्याच्या जादूई पेन्सिलने लहान मुलांना आकर्षित केले होते. आता ‘शाका लाका बूम बूम’ मधील संजू मोठा झाला आहे. 33 वर्षांच्या संजूचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
किंशुकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्यासाठी किंशुकने निळ्या रंगाचा कुर्ता – पायजमा घातला होता. तर होणाऱ्या पत्नीने निळ्या रंगाची साडी नेसली होती. चाहत्यांसोबत कलाकारांनीही त्यांना साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Kinshuk Vaidya Engagement |
View this post on Instagram
किंशुकची होणारी बायको कोण?
किंशुकच्या होणाऱ्या बायकोचे नाव दिक्षा नागपाल असे आहे. दिक्षा ही लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका आहे. ‘पंचायत २’ वेब सीरिजमधील एका आयटम साँगचं नृत्यदिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. काही महिन्यांपूर्वी किंशुकचं ‘चन्ना वे’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याचं दिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. तसंच गाण्याची निर्मिती देखील तिच्याच कंपनीची होती.
किंशुक वैद्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘शाका लाका बूम बूम’ व्यतिरिक्त त्याने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याने ‘वो तो है अल्बेला’, ‘वो अपना सा’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘जात ना पूछो प्रेम की’ आणि ‘कर्ण संगिनी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
दरम्यान, दिक्षा नागपालच्या आधी किंशुक वैद्य हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री शिव्या पठानियाला डेट करत होता. पण २०२१मध्ये किंशुक आणि शिव्याचा ब्रेकअप झाले. Kinshuk Vaidya Engagement |
हेही वाचा:
“जनतेचा हातोडा उद्या तुमच्या टाळक्यात बसणार” ; ठाकरे गटाची राज्य सरकारवर सडकून टीका





