World Athletics U20 C’ship : शैली सिंहची अंतिम फेरीत धडक
Updated On:

नैरोबी – भारताची युवा ऍथलेटिक्सपटू शैली सिंहने जागतिक अंडर-20 ऍथलेटिक्स स्पर्धेत अपेक्षानुरूप प्रदर्शन केले. शैली सिंहने शुक्रवारी लांबउडीच्या पात्रता फेरीत 6.40 मीटर उडी घेत पहिले स्थान पटकावित अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
17 वर्षीय शैलीही पदकाची दावेदार मानली जात आहे. तिने स्पर्धेतील ब गटातून तिसऱ्या आणि अंतिम उडीत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. तिला दुसरी उडी 5.98 मीटर नोंदविता आली होती. आता रविवारी अंतिम फेरी होणार असून तिच्यासमोर प्रतिस्पर्धींचे कडवे आव्हान असणार आहे.
स्वीडनच्या 18 वर्षीय माजा असकागने अ गटातून 6.39 मीटरची नोंद करत सर्वप्रतिस्पर्धींमध्ये दुसरे स्थान पटकाविले आहे. तसेच ब्राझीलची लिसांद्रा कम्पोस (6.36 मीटर), जमैकाची शांते फोरमॅन (6.27 मीटर) आणि युक्रेनची मारिया होरिलोवा (6.24 मीटर) याही पदकाच्या दावेदार मानल्या जात आहे.





