Paris Olympics 2024 (Shooting) : कोल्हापूरकर स्वप्निल कुसळेची अंतिम फेरीत धडक…

Paris Olympics 2024 (Shooting, Men’s Individual 50m R3P) : पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन पुरुष पात्रता फेरीत ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही, परंतु चांगली गोष्ट म्हणजे भारताच्या आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने सातव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.
मूळ कोल्हापूरचा असणारा स्वप्निल कुसळेने पुरुष गटाच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्वप्निलने 590 गुणांसह सातवे स्थान राखले. चीनच्या लीयु युकूनने 594 गुणांसह पहिले तर नॉर्वेच्या जॉन-हर्मन हेगने 593 गुणांसह दुसरे स्थान राखले. युक्रेनच्या सेरहीय कुलीशने 592 गुण मिळविताना तिसरे स्थान मिळविले.
आज झालेल्या लढतीमध्ये भारताचा दुसरा नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर 589 गुणांसह 11 व्या स्थानी राहिला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत 8 स्पर्धक प्रवेश करत असल्याने भरताना नेमबाज स्वप्निल कुसळेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या गटाची अंतिम फेरी उद्या म्हणजे गुरूवारी (1 ऑगस्ट) रंगणार आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत भारताने ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकलेले नाही.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती भारतीय ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग आणि आशियाई क्रीडा 2023 च्या महिला संघाची रौप्यपदक विजेती राजेश्वरी कुमारी महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकल्या नाहीत. राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंग यांनी प्रत्येकी 113-113 गुण प्राप्त केले आणि त्या अनुक्रमे 22 व्या आणि 23 व्या स्थानावर राहिल्या. पृथ्वीराज तोंडाईमन मंगळवारी पुरुषांच्या ट्रॅप पात्रता फेरीत 21व्या स्थानावर होता.
Paris Olympics 2024 | मनु भाकरने पटकावले सलग दुसरे पदक; सरबजोतच्या साथीने रचला इतिहास
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि ईशा सिंग शुक्रवारी महिलांच्या 25 मीटर पिस्तुल स्पर्धेत भाग घेतील. शॉटगन स्कीट स्पर्धांमध्ये भारताच्या मोहिमेलाही त्याच दिवशी सुरुवात होईल.





