शाहरुख खानच्या लेकाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; पहिल्या वेबसिरिजची केली घोषणा

Shah Rukh Khan | बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खानने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला आहे. यानंतर शाहरुखचा मुलगा आर्यन खान देखील बॉलीवूडमध्ये नशीब आजमवण्यासाठी सज्ज होणार आहे. आर्यन खान त्याच्या वेब सीरिजमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. परंतु आर्यन एक अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
आर्यन खान त्याच्या होम प्रोडक्शन रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली वेब सीरिजसाठी व्यस्त आहे. या मालिकेतून आर्यन दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता याबाबत नेटफ्लिक्सने पोस्ट शेअर केली आहे. “नेटफ्लिक्सने रेड चिलीज एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे आणि आम्ही दोघे लवकरच एक वेब सीरिज घेऊन येत आहोत, जी गौरी खान निर्मित आणि आर्यन खान दिग्दर्शित करणार आहे,” असे सांगण्यात आले आहे.
It’s a special day when a new story is being presented for the audience. Today is even more special as @RedChilliesEnt and Aryan Khan embark on their journey to showcase their new series on @NetflixIndia . Here’s to untamed story telling….controlled chaos…gutsy scenes and lots… pic.twitter.com/8v0eBzRZ6S
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 19, 2024
दरम्यान, नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट यांच्या भागिदारीतून २०२५ मध्ये एक बॉलीवूड सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजची निर्मिती गौरी खान करणार आहे. तर, या सीरिजच्या निमित्ताने आर्यन खान क्रिएटर आणि दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या मेगा प्रोजेक्टची घोषणा लॉस एंजेलिसमध्ये एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आली होती. Shah Rukh Khan |
या घोषणेनंतर शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. शाहरुखची झलक त्याच्या मुलाच्या पहिल्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळेल, अशी सर्वांना आशा आहे. मात्र, त्याची रिलीज डेट आणि स्टार कास्ट याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही वेबसीरिज पुढील वर्षी २०२५ मध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Shah Rukh Khan |
हेही वाचा:





