शाहरुख खानची लेक सुहानाचा बोल्ड अंदाज; फोटो व्हायरल

मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान खूप चर्चेत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सुहाना स्टारकिड्समध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि तिच्या ग्लॅमरस लुकने ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. लवकरच ती झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मध्ये दिसणार आहे. नुकतेच सुहानाने एक बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोशूटसाठी सुहानाने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. सध्या तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस पडत आहे. तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री अनन्या पांडेने देखील तिच्या फोटोवर ‘हॅलो’ असे म्हणत इमोजी शेअर केला आहे. दरम्यान, वडील शाहरुख खानप्रमाणे सुहाना देखील बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी तयार झाली आहे. ‘द आर्चीज’ या चित्रपटात सुहानासह श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाही दिसणार आहेत.
अभिनयानंतर आता सुहानाने शेतीही विकत घेतली आहे. सुहाना खानने शेतजमिनीच्या नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये स्वतःला शेतकरी असल्याचे सांगितले आहे. सुहाना खानच्या या स्टेपमुळे तिला काय करायचे आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या जमिनीची किंमत 13 कोटी रुपये आहे. या दीड एकर जागेवर 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. या जमिनीचा व्यवहार 1 जून रोजी झाला असून त्यासाठी सुहानाने 77 लाख 46 हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. सुहाना खानने ही जमीन तीन बहिणींकडून (अंजली, रेखा आणि प्रिया) विकत घेतली आहे. त्या बहिणींना त्यांच्या आई-वडिलांकडून ती जमीन वारसाहक्काने मिळाली आहे.





