Shahid kapoor: तीन वर्षांच्या वयातच पालक वेगळे; ‘स्टार किड’ असूनही शाहिद कपूरला कधी मिळाला नाही फायदा

Shahid kapoor : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहिद कपूर सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. आज तो लाखोंच्या पसंतीचा कलाकार आहे, पण या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी शाहिदने खूप संघर्ष केला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक आठवणी आणि अनुभव स्पष्टपणे सांगितले.
लहानपणीच पालकांचा घटस्फोट
शाहिद म्हणाला की, जेव्हा ते फक्त 3-4 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा अभिनेता पंकज कपूर आणि नृत्यांगना नीलिमा अजीम यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शाहिद आईसोबतच राहत होते. वडिलांसोबत त्यांचा जास्त वेळ गेलाच नाही. त्यामुळे इंडस्ट्रीतील अनेकांना बराच काळ हे माहीतही नव्हते की शाहिद हे पंकज कपूर यांचेच पुत्र आहेत.
‘स्टार किड’ असूनही कधी मिळाला नाही आधार
शाहिद म्हणाले, “मला कधीही स्टार किड असल्याचा फायदा झाला नाही. आईने मला एकटीने वाढवलं. मी कधीच बाबांचं नाव वापरून काम घेतलं नाही, न त्यांनी कधी माझ्यासाठी कोणाला फोन केला.” ते पुढे म्हणाले की, जे काही मिळवले ते केवळ स्वतःच्या मेहनतीने.
शाहिदचे कौटुंबिक आयुष्य
आज शाहिद कपूर हे बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते मीरा राजपूत यांचे पती आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. शाहिद सांगतात की, “शूटिंगहून घरी परतताच मी फक्त पती, वडील आणि मुलगा असतो. काम कधीच घरात आणत नाही.”
कामाचे अपडेट्स
शाहिद शेवटचे ‘देवा’ या चित्रपटात दिसले होते. सध्या ते विशाल भारद्वाज यांच्या नव्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत, ज्यात तृप्ती डिमरी आणि नाना पाटेकर हे कलाकारही दिसणार आहेत. याशिवाय शाहिद, कृति सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत ‘कॉकटेल 2’ या चित्रपटातही झळकणार आहेत.




