Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरीची प्रमुख भूमिका असलेला ‘ओ रोमियो’ रिलीजनंतर काही दिवसांतच ओटीटीवर रिलीज होणार आहे. १३ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रदर्शनाच्या ५ दिवसांनंतर या रोमॅन्टिक अॅक्शन चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अपडेट समोर आली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओ रोमिओ सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर कधी स्ट्रीम होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. ओ रोमिओ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केल्यानंतर हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. O’Romeo Film मिडिया रिपोर्टनुसार, एप्रिल २०२६ पर्यंत हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. आता लवकर हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. दरम्यान, ‘ओ रोमियो’ हा सिनेमा हुसैन झैही यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे. या सिनेमात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, दिशा पटानी, अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. Shahid Kapoor: रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांतच चित्रपटाने धुमाकूळ घालत २० कोटींची कमाई केली आहे. ओ रोमियो’ चित्रपटाने २०२६ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी पटेल’, ‘राहु केतू’, ‘वध २’, ‘भाभीजी घर पर हैं’ आणि ‘तू या मैं’ या चित्रपटांना मागे टाकले आहे. Shahid Kapoor: हेही वाचा: Kalyani Priyadarshan : बजेट 33 कोटी, कमावले 183 कोटी! ‘या’ अॅक्शनपॅक्ट चित्रपटाचा दुसरा भाग येण्यासाठी सज्ज; अभिनेत्रीने दिली मोठी हिंट