Pahalgam terror attack: “काश्मीर नरक बनत चाललंय, निरपधारांना लक्ष्य केलं जातंय”: सलमान खान, शाहरुख, आलिया, अनुष्का, सिद्धार्थ…. बॉलिवूडचा पहलगाम हल्ल्यावर संताप

मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने दुख: आणि संताप व्यक्त केला आहे. “पृथ्वीवरील स्वर्ग असलेलं काश्मीर नरक बनत आहे. निरपधारांना लक्ष्य केलं जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. एका निष्पापाची हत्या म्हणजे संपूर्ण विश्वाची हत्या आहे,” असे सलमानने X वर पोस्ट केले.
बॉलिवूड सेलिब्रिटींचा निषेध-
सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे:
शाहरुख खान: “पहलगाममधील विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचारामुळे दुख: आणि संताप आहे. अशा वेळी फक्त प्रार्थना करू शकतो. देशाने एकजुटीने उभं राहून या जघन्य कृत्यासाठी न्याय मागावा,” असे शाहरुखने X वर लिहिले.
Kashmir,heaven on planet earth turning into hell. Innocent people being targeted, my heart goes out to their families . Ek bhi innocent ko marna puri kainath ko marne ke barabar hai
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 23, 2025
आलिया भट्ट: “पहलगाममधील बातमी हृदयद्रावक आहे. निष्पापांचा बळी गेला. पर्यटक, कुटुंबं, शांतता आणि सौंदर्य शोधणारे लोक… आता फक्त शोक आहे,” असे तिने व्यक्त केले.
Words fail to express the sadness and anger at the treachery and inhumane act of violence that has occurred in Pahalgam. In times like these, one can only turn to God and say a prayer for the families that suffered and express my deepest condolences. May we as a Nation, stand…
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 23, 2025
अनुष्का शर्मा: या हल्ल्याला “थंड डोक्याने केलेला दहशतवादी हल्ला” संबोधले.
सिद्धार्थ मल्होत्रा: “हे भ्याड कृत्य आहे. मला आपल्या सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास आहे, ते आवश्यक ती कारवाई करतील,” असे त्याने सांगितले.
हल्ल्याचा राजकीय आणि आंतरराष्ट्रीय निषेध –
या हल्ल्याचा राजकीय पक्षांसह जागतिक नेत्यांनीही तीव्र निषेध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी श्रीनगर येथे सुरक्षा आढावा बैठक घेतल्यानंतर पहलगाममधील हल्लास्थळाला भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सध्याच्या परिस्थिती आणि सुरू असलेल्या ऑपरेशन्सबाबत माहिती दिली.
तपास आणि सुरक्षा उपाय –
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जम्मू-काश्मीर पोलिसांना सहाय्य करण्यासाठी हल्लास्थळाची पाहणी केली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली असून, परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
देश हादरला –
पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या निषेधामुळे हा विषय अधिक चर्चेत आला असून, निरपधारांच्या हत्येविरुद्ध एकजुटीने लढण्याचा संदेश देशभर पसरत आहे.





