शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर

Shahid kapoor And Mira New Home| बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत असतात. यातच आता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीराने जुहूमध्ये एक अलिशान लक्झरियस अपार्टमेंट खरेदी केले होते.
मुंबईच्या वरळी भागात शाहिदचे 5395 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेले नवं घर आहे. या घराची किंमत 59 कोटी रुपये इतकी किंमत आहे. या घरासाठी शाहिदने 1.75 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्यूटी भरलेला आहे. हे नवीन घर त्यांनी 24 मे 2024 रोजी खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे.
शाहिद आणि मीराने टॉप फ्लोअरवर हा लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला आहे. शाहिद आणि मीराने चंदक रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून हे अपार्टमेंट खरेदी केला आहे. मात्र शाहीद आपल्या कुटुंबासह या घरात कधी शिफ्ट होईल हे अद्याप समजलेले नाही. Shahid kapoor And Mira New Home|
शाहिदच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा क्रिती सेननसोबत ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’मध्ये दिसला होता. आता तो ‘देवा’ आणि ‘फर्जी २’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘देवा’मध्ये शाहिद पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून त्यात पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत असणार आहे. Shahid kapoor And Mira New Home|
हेही वाचा:
दिव्या अग्रवालने घटस्फोटाच्या चर्चांवर दिले स्पष्टीकरण; म्हणाली “कथेचा शेवट…”





