Shahid Afridi Statement : “आयसीसी दुटप्पी वागतंय!” बांगलादेशच्या हकालपट्टीवर शाहिद आफ्रिदीचा संताप
Shahid Afridi statement : शाहिद आफ्रिदीच्या मते आयसीसीने बांगलादेशचा समस्या समजून घ्यायला हवी होती.

Shahid Afridi statement on Bangladesh ICC decision : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बांगलादेशला बाहेर करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) निर्णयामुळे क्रिकेट विश्वात नवा वाद पेटला आहे. या प्रकरणावर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने उडी घेतली असून, त्याने आयसीसीवर पक्षपाताचे गंभीर आरोप केले आहेत. भारताच्या बाबतीत वेगळा आणि बांगलादेशच्या बाबतीत वेगळा न्याय का? असा सवाल आफ्रिदीने उपस्थित केला आहे.
काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिला होता आणि सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. जी आयसीसीने फेटाळून लावली. यावर आफ्रिदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून मी आयसीसीच्या निर्णयाने प्रचंड निराश आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी जेव्हा भारताने पाकिस्तानात येण्यास नकार दिला, तेव्हा आयसीसीने त्यांच्या समस्या समजून घेतल्या होत्या. पण आता बांगलादेशच्या बाबतीत मात्र आयसीसी सामंजस्य दाखवायला तयार नाही.”
शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला, “क्रिकेटमध्ये निष्पक्षता असायला हवी. बांगलादेशी खेळाडू आणि त्यांचे लाखो चाहते सन्मानासाठी पात्र आहेत. आयसीसीने समस्या सोडवायला हवी होती, ती वाढवायला नको होती. हे पूर्णपणे चुकीचे आहे.”
Shahid Afridi have criticised the ICC’s decision to remove Bangladesh from the tournament:🗣️🚨
“Consistency and fairness are the foundation of global cricket governance. Bangladesh’s players and millions of its fans deserve respect – not mixed standards. The ICC should build… pic.twitter.com/6htp0B9toC
— Danish (@BhttDNSH100) January 25, 2026
नेमकं प्रकरण काय?
शाहिद आफ्रिदीने आयसीसीवर केला पक्षपातीचा आरोप
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर बांगलादेशने सुरक्षेचा हवाला देऊन भारतात येण्यास नकार दिला. मात्र, आयसीसीने भारतातील सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे सांगत बांगलादेशची विनंती फेटाळली आणि अखेर त्यांना स्पर्धेतून बाद करून स्कॉटलंडला संधी दिली.
स्कॉटलंडचे ‘गट क’ मधील वेळापत्रक:
बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडचा संघ कोलकाता आणि मुंबईत आपले सामने खेळणार आहे.
- ७ फेब्रुवारी: विरुद्ध वेस्ट इंडिज (कोलकाता)
- ९ फेब्रुवारी: विरुद्ध इटली (कोलकाता)
- १४ फेब्रुवारी: विरुद्ध इंग्लंड (कोलकाता)
- १७ फेब्रुवारी: विरुद्ध नेपाळ (मुंबई)





