शाहरुख खानला ‘किंग’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दुखापत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

Shah Rukh Khan Injured | बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटाची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या तो त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट शाहरुखसाठी खास असणार आहे. कारण यात शाहरुखची मुलगी सुहाना देखील पाहायला मिळणार आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच शूटिंगदरम्यान शाहरुख जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
एका कार्यक्रमासाठी शाहरुख राजस्थानमध्ये आला होता. जयपूर विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. मात्र यावेळी शाहरुख खानच्या खांद्यावर एक काळी पट्टी दिसून आली. ज्यानंतर शुटींगदरम्यान त्याला दुखापत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्नायूंना ताण आल्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या दुखापती झाल्यास डॉक्टर या प्रकारच्या टेपचा वापर करतात. शाहरुखने नुकतेच ‘किंग’ चित्रपटातील काही अॅक्शन सीक्वेन्सचे शूटिंग केले आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर दिसणारी ही पट्टी शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे असण्याची शक्यता आहे. Shah Rukh Khan Injured |
King #ShahRukhKhan clicked at Jaipur Airport 😍@iamsrk#SRK #teamshahrukhkhan pic.twitter.com/mpra3bXc8L
— Team Shah Rukh Khan Fan Club (@teamsrkfc) March 7, 2025
दरम्यान, बराच काळ सिनेमाच्या जगापासून दूर राहिल्यानंतर शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर परतला. त्याने पठाण, जवान, डंकी हे सलग तीन सुपरहिट चित्रपट केले. या चित्रपटानंतर शाहरुख पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर पुनरागमन करणार आहे. चाहते देखील ‘किंग’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. Shah Rukh Khan Injured |
‘किंग’ चित्रपटात शाहरुख आणि सुहाना एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. सुहाना खानने ‘द आर्चिज’ या चित्रपटातून डेब्यू केले. त्यानंतर आता ती शाहरुख खानसोबत दिसणार आहे.
हेही वाचा:





