“ज्या दिवशी शो बंद होईल त्या दिवशी मी सुद्धा…” अमिताभ बच्चन अस का म्हणाले? मंचावरच झाले भावूक, प्रेक्षक म्हणाले प्लीज….

बॅालीवूड इंडस्ट्रीमधील महानायक अर्थात बिग बी म्हणून अमिताब बच्चन यांना ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील अमिताभ हे न थकता आपले काम करत असतात. ते सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी त्यांच्या वर्कबद्दल किंवा त्यांच्या आयुष्यातील गोष्टी ते नेहमी शेअर करत असतात. काही दिवसांपूर्चीची गोष्ट अमिताभ यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडियावर हॅन्डलवरून एक ट्वीट शेअर केले होते.
“आता जाण्याची वेळ झाली” या अवघ्या काही शब्दांचीच ट्वीटने चाहत्यांना त्यांची काळजी वाटू लागली होती. हे ट्वीटची बरीच चर्चेत राहिली होते. ते नेहमीच अशा प्रकाराच्या क्रिप्टीक पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का देत असतात. नुकतेच त्यांनी केबीसीच्या मंचावरून एक विधान केले आहे, त्यांच्या या विधानामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ते हे विधान करताना भावूकही झाले होते.
तुम्हीच आहात ज्यामुळे मला ऊर्जा मिळते. पुढे अमिताभ बच्चन भावुक होऊन म्हणाले की, ‘ज्या दिवशी हा शो बंद होईल त्याच दिवशी मी सुद्धा बंद होईन’ अमिताभ यांचे वक्तव्य ऐकून सगळेच थक्क झाले. उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी त्यांना असे न बोलण्याची विनंती केली. पण तरीही बच्चन पुढे म्हणाले, ‘मी अत्यंत योग्य बोलतोय. शेवटी मी एक कलाकार आहे आणि त्यामुळे माझ्यातल्या कलाकाराला अशाच गोष्टी जिवंत ठेवतात.
तुमच्या भावना माझ्यासाठी जेवण
तुम्ही मोठ्या पडद्यावर मला बघता. मी जे काही करेल ते तुम्हाला प्रचंड आवडतं. तुम्ही त्या गोष्टीचं कौतुक करता. जोरजोरात टाळ्या वाजवता. तुमच्या टाळ्या माझ्यासाठी जेवणासारख्याच आहे, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली. हे बोलतना त्यांच्या डोळ्यात अलगत पाणी आले होते.





