Shaan : ‘सगळं काही स्क्रिप्टेड, प्रेक्षकांना मुर्खात काढतात..’; शानचा धक्कादायक खुलासा !

Shaan : टीव्ही रिअॅलिटी शो गेल्या काही काळापासून चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईस यांनी याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते आणि आता गायक शानने या रिअॅलिटी शोबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. शान हा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे.
त्याने ‘द व्हॉइस इंडिया’, ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’ यासह टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांचे परीक्षण केले आहे. आता अलिकडेच, त्याने एका पॉडकास्टमध्ये याबद्दल बरेच काही शेअर केले आहे आणि अशा रिअॅलिटी शोपासून दूर राहण्याचा निर्णय का घेतला हे सांगितले आहे.
खरंतर, शान अलीकडेच विकी लालवानीच्या पॉडकास्टचा भाग बनला आहे. तिथे त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी, व्यावसायिक आयुष्याशी आणि रिअॅलिटी शोशी संबंधित गोष्टी शेअर केल्या. २०१८ नंतर रिअॅलिटी शो निर्मितीची प्रक्रिया कशी बदलली आहे याबद्दल शानने सांगितले.
फक्त गायन कार्यक्रमाबद्दल बोलताना, तो म्हणाला की स्पर्धक स्टेजवर फक्त एकदाच लाईव्ह गातात, परंतु नंतर त्यांचे गाणे पूर्णपणे पुन्हा डब केले जाते. ऑडिओ स्टुडिओमध्ये घेऊन जातात आणि त्यांना पुन्हा गाण्यास सांगतात. गेल्या काही वर्षांपासून हे सुरू आहे. नंतर ते दुरुस्त केले जातात’
शानने असेही सांगितले की, अशा रिअॅलिटी शोचे परीक्षक देखील एपिसोडच्या शेवटी असलेल्या एडिटला लक्षात घेऊन त्यांची प्रतिक्रिया देतात. रिअॅलिटी शोचा टीआरपी पूर्वी खूपच चांगला होता कारण नंतर त्यातील कंटेंट खरा ठेवला जात असे. सुरुवातीला जेव्हा या गोष्टी जबरदस्तीने लादल्या जात होत्या तेव्हा मला काही समस्या आल्या”. असं तो यावेळी म्हणाला.





