Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्याचा तडकफडकी राजीनामा
Maharashtra Politics : कल्याण-डोंबिवलीतील महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

Maharashtra Politics : कल्याण-डोंबिवलीतील महायुतीच्या राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट)चे पदाधिकारी अर्चित खडकूल यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
भाजपमध्ये प्रवेशानंतर अर्चित खडकूल यांनी शिवसेना (शिंदे गट) नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी सातत्याने काम करूनही योग्य वेळी जबाबदारी आणि पद मिळाले नाही. तसेच एका बैठकीत आपल्या सहकाऱ्याचा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनांमुळे नाराज होऊन अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही अप्रत्यक्षपणे शिवसेना (शिंदे गट)वर निशाणा साधला. “आमची वाटचाल कासवासारखी असली, तरी शेवटी विजय आमचाच होईल,” असे वक्तव्य करत त्यांनी आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला होता. आता त्यानंतर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरल्याने दोन्ही पक्षांतील पक्षांतरांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. (Maharashtra Politics)
महापालिका निवडणुका जवळ येत असताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेले हे परस्पर पक्षांतर आणि वाढता शाब्दिक संघर्ष स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना कारणीभूत ठरत आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राज्यात भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्यानं सोडली साथ






