SET Exam 2026 : विद्यार्थ्यांना दिलासा! सेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
SET Exam: अर्ज प्रक्रियेच्या मुदतीत वाढ, पण परीक्षेच्या मूळ दिनांकात कोणताही बदल नाही

SET Exam: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ४१ व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेसाठी (MH-SET) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना विना विलंब शुल्क २६ जून २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
यापूर्वी सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २ जून ते १६ जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, मागील १५ दिवसांत अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची जुळवाजुळव किंवा इतर कारणांमुळे अर्ज भरणे शक्य झाले नव्हते. (SET Exam 2026)
या पार्श्वभूमीवर राज्यभरातून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांचे हित आणि ही मागणी विचारात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने वेळापत्रकात सुधारणा करत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (SET Exam 2026)
नवीन सुधारित वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना आता १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत विना विलंब शुल्क ऑनलाईन अर्ज भरता येईल. जे उमेदवार या मुदतीत अर्ज करू शकणार नाहीत, त्यांना २७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करावा लागेल. (SET Exam 2026)

SET Exam 2026 : विद्यार्थ्यांना दिलासा! सेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
तर ज्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन फॉर्म भरताना चुका झाल्या आहेत, त्यांच्यासाठी विद्यापीठाने अर्जात दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र कालावधी दिला आहे. अर्जात चुकीची माहिती भरली गेलेल्या विद्यार्थांना १ जुलै ते ३ जुलै २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत आपल्या लॉगिनचा वापर करून माहिती दुरुस्त करता येऊ शकते.
दरम्यान, अर्ज प्रक्रियेच्या मुदतीत वाढ करण्यात आली असली, तरी परीक्षेच्या मूळ दिनांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार २६ जुलै २०२६ रोजीच पार पडणार आहे. (SET Exam 2026)
हेही वाचा:





