Ankita Walawalkar: ‘मी कान्समध्ये का गेले?’; ट्रोलर्सना कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचं सडेतोड उत्तर
Ankita Walawalkar एका मुलाखतीत अंकिता म्हणाली की, कान्समध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लोबल नेटवर्किंग आणि ब्रँडिंग केलं जातं. तिथे केवळ कलाकारच नसतात, तर अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, सौंदर्यप्रसाधन कंपन्या, मोबाईल कंपन्या आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधीही सहभागी होतात.

Ankita Walawalkar: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेली ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर नुकतीच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’मध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व केलं. मात्र, कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलर्सना अंकिताने आता स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिलं आहे. (Ankita Walawalkar)
यावर्षी ७९ वा कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) पार पडला. या सोहळ्यात भारतातील अनेक कलाकार, अभिनेत्री, मॉडेल्स आणि इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मराठी कलाकारांनीही यावेळी दिमाखदार उपस्थिती लावली. अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, जयंती वाघधरे आणि अंकिता प्रभू वालावलकर यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. (Ankita Walawalkar)
अंकिताने या सोहळ्यात गुलाबी रंगाचा पैठणी शैलीतील गाऊन परिधान केला होता. तिच्या या पारंपरिक आणि आधुनिक लूकचं सोशल मीडियावर मोठं कौतुक झालं. अनेक चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं. मात्र, काही जणांनी ‘कान्स हा फिल्म फेस्टिव्हल आहे, मग एका इन्फ्लुएन्सरचं तिथे काय काम?’ असा प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल केलं.
या टीकेला उत्तर देताना अंकिताने स्पष्ट केलं की, अनेकांना कान्स फेस्टिव्हलबद्दल पुरेशी माहिती नसते. केवळ नावात ‘फिल्म फेस्टिव्हल’ असलं तरी हा कार्यक्रम फक्त चित्रपटांपुरता मर्यादित नाही. (Ankita Walawalkar)
View this post on Instagram
एका मुलाखतीत अंकिता म्हणाली की, कान्समध्ये मोठ्या प्रमाणावर ग्लोबल नेटवर्किंग आणि ब्रँडिंग केलं जातं. तिथे केवळ कलाकारच नसतात, तर अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, सौंदर्यप्रसाधन कंपन्या, मोबाईल कंपन्या आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधीही सहभागी होतात. हे ब्रँड्स कार्यक्रमाचे प्रायोजकही असतात आणि त्यांचं प्रमोशनही तिथे केलं जातं. (Ankita Walawalkar)
अंकिताने पुढे सांगितलं की, ती तिथे मराठी भाषेचं आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा उद्देशही त्यामागे होता. (Ankita Walawalkar)
तिने सांगितलं की, कान्समध्ये महाराष्ट्रासाठी उभारलेल्या बूथला भेट देण्याची संधी मिळाली. तिथे विविध देशांतील लोकांशी संवाद साधता आला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम कसं चालतं, याचा अनुभव घेता आला. (Ankita Walawalkar)
अंकिता म्हणाली, “आज मी इन्फ्लुएन्सर म्हणून कान्सला गेले आहे. पण भविष्यात कदाचित एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानेही तिथे जाण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे स्वतःला मर्यादित समजण्याची गरज नाही.” (Ankita Walawalkar)
अंकिताच्या या स्पष्ट उत्तराचं अनेकांनी कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचं आणि मराठी संस्कृतीचा अभिमानाने केलेल्या सादरीकरणाचं स्वागत केलं आहे. (Ankita Walawalkar)
आजच्या काळात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स हे केवळ डिजिटल माध्यमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते विविध क्षेत्रांमध्ये देश, भाषा आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असल्याचंही या उदाहरणातून दिसून आलं आहे. (Ankita Walawalkar)





