पुणे | मतभेद बाजूला ठेवून काम करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून येणारा महिना हा पक्षासाठी समर्पित करावा. पक्षश्रेष्ठी जे महाविकास आघाडीचे उमेदवार देतील, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहवे.
त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी सचोटीने प्रयत्न करावेत, असा सल्ला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दिला आहे.
पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस भवन येथे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
या वेळी प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी, महिला शहराध्यक्ष पूजा आनंद, पुणे लोकसभा समन्वय अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, मनिष आनंद, उस्मान तांबोळी, मेहबुब नदाफ, भिमराव पाटोळे, प्रियंका रणपिसे,
सुजित यादव, प्रदिप परदेशी, समीर शेख, आशितोष शिंदे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, अक्षय माने, राजू ठोंबरे, रमेश सकट, विशाल जाधव, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, सुनील शिंदे, कैलास गायकवाड, राजेंद्र भुतडा आदी उपस्थित होते.





