Arvind Shinde : नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. काल रात्री उशिरा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला. यानंतर पुण्यातील काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया समोर आली असून, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे. रुपाली चाकणकर यांची बदनामी करू नका, गरज पडल्यास त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करू, असे वक्तव्य अरविंद शिंदे यांनी केले आहे. तसेच नाशिकच्या खरातच जे प्रकरण आम्हाला दिसतय. त्यामध्ये खरातवर कारवाई झाली पाहिजे. अशा व्यक्तीला बाहेर सोडलाच नाही पाहिजे ही आमची पहिली भूमिका आहे. पण खरातला बाजूला ठेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर जो निशाणा साधला जातोय. यात स्पष्टपणे राजकीय गणित दिसत आहेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. Arvind Shinde हेही वाचा : Dhurandhar 2: ‘धुरंधर २’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; दोन दिवसांत २०० कोटी पार, ‘पुष्पा २’लाही टाकलं मागे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना दखल घेतली नसेल, कामात कुचराई केली असेल तर त्यावर बोलले पाहिजे. ज्यावेळेला तक्रारी दाखल झाल्या, त्यावेळी बोललं पाहिजे होतं. आज खरातला जे धरलं आहे. खरातचं जे षडयंत्र चालू आहे, पोलीस डोळे बंद करुन होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे, वरिष्ठ प्रवक्ते, महाराष्ट्र काँग्रेस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी अरविंद शिंदेंनी रुपाली चाकणकरांच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती त्यांच वैयक्तिक मत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय म्हणाले अतुल लोंढे? Arvind Shinde ‘रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका’; पुण्यातील काँग्रेस नेत्याचे वक्तव्य (Arvind Shinde) अरविंद शिंदेंनी रुपाली चाकणकरांच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती त्यांच वैयक्तिक मत आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा एपस्टीन खरात याने जे काही कृत्य केलेलं आहे ते माफीला लायक नाही. रुपाली चाकणकरांचा आणि त्यांचा संबंध स्पष्टपणे दिसतोय. चाकणकर यांच्यावर या महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या काळजीची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीपासून त्या दूर झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे: काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह Arvind Shinde पुणे काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांची बदनामी करु नका असे म्हटले आहे. दुसरीकडे पुणे शहर काँग्रेसच्या महिला आघाडीकडून चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका कोणती आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हेही वाचा :Rohini Khadse : आणखी काही गोष्टी बाहेर पडतील! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाच्या महिला नेत्याचा इशारा