Political Leader : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकीय वर्तुळात शोककळा
Political Leader : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे मदन बाफना यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

Political Leader : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या निधनाने मावळ तालुक्यासह महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. वयाच्या ८६व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी (ता. १५) दुपारी चार वाजता वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (Political Leader)
आयुष्यभर समाजकारण आणि जनसेवेचा वसा जपणारे बाफना हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर अनेक दिग्गज नेत्यांचे निकटचे सहकारी, मित्र आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणूनही परिचित होते. (Political Leader)
मदन बाफना हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटचे समर्थक होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच शरद पवार आणि मदन बाफना यांचे घनिष्ठ संबंध होते. दोघे वर्गमित्रही राहिले होते. काँग्रेसच्या विचारधारेपासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास पुढे विविध महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचला. (Political Leader)
मावळ तालुक्यात काँग्रेसची विचारधारा रुजवण्यासह ती जपण्यात बाफना यांचा मोठा वाटा होता. त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. दोन वेळा आमदार आणि दोन वेळा राज्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात योगदान दिले. (Political Leader)
१९६७ मध्ये एलएल.बी.ची पदवी घेतल्यानंतर केवळ वकिलीच्या क्षेत्रात न जाता त्यांनी जनसेवेचा मार्ग स्वीकारला. तळागाळातील नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी केलेले समाजकार्य आणि जपलेली विचारधारा हीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची प्रमुख ओळख राहिली. मावळ तालुक्याच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. (Political Leader)
पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्या अभ्यासू आणि संसदीय कार्यपद्धतीची दखल घेत त्यांची सभापती तालिकेवर निवड झाली होती. ही त्यांच्या संसदीय कौशल्याची साक्ष मानली जाते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. (Political Leader)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या काळात संस्थापक सदस्य म्हणूनही मदन बाफना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने बाफना कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Political Leader)
माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक
प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांनी स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या बाफना यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. (Political Leader)
मी माझा ६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला आहे, या शब्दांत शरद पवार यांनी बाफना यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन असलेले मैत्रीचे आणि विश्वासाचे नाते त्यांच्या आणि मदन बाफना यांच्यात होते, असे पवार यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. (Political Leader)
छगन भुजबळांकडून श्रद्धांजली
मदन बाफना यांच्या निधनाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत दुःख व्यक्त केले. बाफना यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक जीवनाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे भुजबळ यांनी म्हटले. (Political Leader)
बाफना यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा उल्लेख करत भुजबळ यांनी त्यांच्या जनसेवेची परंपरा कायम स्मरणात राहील, असे म्हटले. तसेच बाफना परिवाराच्या दुःखात आपण सर्व सहभागी असल्याचे सांगत, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. (Political Leader)
Political News : मोठा राजकीय भूकंप..! तब्बल २२ आमदारांचे निलंबन, राज्यात खळबळ





