Political News : मोठा राजकीय भूकंप..! तब्बल २२ आमदारांचे निलंबन, राज्यात खळबळ
Political News : तेलंगणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.

Political News : तेलंगणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. विविध मुद्द्यांवरून आक्रमक झालेल्या भारत राष्ट्र समितीच्या (BRS) आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली. (Political News)
या गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांनी कडक कारवाई करत BRS चे कार्याध्यक्ष के. टी. रामा राव (KTR), माजी मंत्री टी. हरीश राव यांच्यासह तब्बल २२ आमदारांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले. (Political News)
सभागृहाचे कामकाज सुरू होताच BRS आमदारांनी शेतकरी कर्जमाफी, स्थानिक प्रश्न आणि सरकारच्या विविध धोरणांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. यावेळी आमदारांनी अध्यक्षांच्या पीठासनासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांनी वारंवार सूचना करूनही गोंधळ सुरूच राहिल्याने काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. (Political News)
यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने विधिमंडळ कामकाज मंत्र्यांनी BRS आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर KTR आणि हरीश राव यांच्यासह २२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (Political News)
महिला आमदारांशी कथित गैरवर्तनाचा मुद्दा (Political News)
या संपूर्ण गदारोळामागे BRS आमदारांनी उपस्थित केलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाच्या महिला आमदारांशी पोलिसांकडून झालेल्या कथित गैरवर्तनाचा आरोप. या प्रकरणी सरकारने बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी BRS आमदारांनी केली. (Political News)
दरम्यान, बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच आणखी एका मुद्द्यावरून वातावरण तापले. सिद्दिपेट जिल्ह्यातील एर्रावली येथे BRS अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या फार्महाऊसबाहेरील परिसराचे ‘शुद्धीकरण’ केल्याचा आरोप करण्यात आला. (Political News)
काही दिवसांपूर्वी या परिसरात अनुसूचित जातीच्या संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर परिसरात हळदीचे पाणी शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला. (Political News)
राज्यमंत्री अडलुरी लक्ष्मण यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला. दलित संघटनांच्या आंदोलनानंतर परिसराचे ‘शुद्धीकरण’ करणे हा दलितांचा अपमान असल्याचे त्यांनी सभागृहात म्हटले. या मुद्द्यावर तातडीने चर्चा घेण्याची मागणीही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का यांनीदेखील या प्रकाराचा निषेध करत जातीयवादी प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही, असा इशारा दिला. (Political News)
घोषणाबाजीमुळे सभागृहात तणाव
सत्ताधारी नेत्यांच्या वक्तव्यानंतर BRS आमदार पुन्हा आक्रमक झाले. महिला आमदारांशी पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. (Political News)
या गोंधळावर विधानसभा अध्यक्ष गद्दाम प्रसाद कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. सभापतींच्या पीठासनासमोर उभे राहून घोषणाबाजी करण्याऐवजी संबंधित मुद्दा लेखी स्वरूपात मांडण्याचे निर्देश त्यांनी आमदारांना दिले. (Political News)
मात्र, BRS आमदारांचा गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर २२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईनंतर BRS ने सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत विधानसभेच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Political News)
Political News : राजकारणात मोठी खळबळ ! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
Political News : कॅबिनेट मंत्र्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा


