Dhananjay Munde : मोठी बातमी..! धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल
Dhananjay Munde : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.

Dhananjay Munde : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी जनता दरबार सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Dhananjay Munde)
जनता दरबार सुरू असतानाच अचानक अस्वस्थ
आज सकाळी नेहमीप्रमाणे परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात धनंजय मुंडे यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांच्या भेटीगाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू असतानाच मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. (Dhananjay Munde)
परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना तातडीने अतिथीगृहाशेजारील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली आणि पुढील उपचार सुरू केले. (Dhananjay Munde)
डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार
धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येताच त्यांच्या समर्थक आणि नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. (Dhananjay Munde)
सध्या मुंडे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे. (Dhananjay Munde)
Dhananjay Munde : अजित पवारांच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय






