नवी दिल्ली – संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यावेळी बसण्याच्या जागेवरून वेगळेच मानपान रंगले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पत्राद्वारे नाराजी नोंदवली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संबंधात हा प्रकार घडला आहे.
पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा, अनेक केंद्रीय मंत्री सोहळ्याला उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोहळ्याला हजेरी लावली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गाडीची चर्चा; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
मात्र, त्यांची ज्येष्ठता आणि मोठ्या विरोधी पक्षाचे नेते म्हणून असलेल्या पदानुरूप त्यांना जागा देण्यात आली नाही. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. जयराम रमेश या कॉंग्रेस नेत्यांनी राज्यसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “राम सेतुची लव्ह स्टोरी ताज महालपेक्षाही जुनी”