मुंबई – महाराष्ट्र मंत्रिमंडळाने राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने आज दिली. विद्यमान महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी ही नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशुतोष कुंभकोणी यांचा महाधिवक्तापदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. कुंभकोणी हे 2017 पासून या पदावर कार्यरत होते. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती नंतरच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही सुरूच राहिली.