nagar | न्यू इंग्लिश स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांची इस्त्रोसाठी निवड

पारनेर, (प्रतिनिधी) – पारनेर येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पारनेर विद्यालयाने राज्यस्तरीय डॉ.सी.व्ही. रामण बालवैज्ञानिक परीक्षेत नेत्रदिपक यश मिळविले. या परीक्षेत ६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ते सर्व ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयाचा निकाल १०० % लागला. त्यापैकी २२ विद्यार्थ्यांची इस्त्रो सहलीसाठी निवड झाली आहे.
बालवैज्ञानिकांसाठी दरवर्षी जुलै महिन्यात राहुरी कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले जाते. त्यात नामवंत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतात . तेथे विद्यार्थ्यांना पदक, सन्मानपत्र दिली जातात, त्याचबरोबर दुर्बिण, सोलर कार , रोबोटिक्स , मायक्रोस्कोप , जनरेटर अशा सायन्स कीट बक्षीस म्हणून दिली जाते.
गुणवता यादीतील विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो येथे सहलीचे आयोजन केले जाते. थुंबा (केरळ) व श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) येथे जाऊन प्रत्यक्ष अग्निबाणाचे प्रक्षेपण पाहण्याची संधी बालवैज्ञानिकांना उपलब्ध करून दिली जाते. विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
रामन बालवैज्ञानिक परीक्षेत विद्यालयाने अव्वल स्थान मिळविले आहे . गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी :मल्हार कुलकर्णी, देवाशिष आंबेकर, साई वैद्य, राजवर्धन खिलारी, आरुष कांबळे, आझाद गायकवाड , साईराज घोरपडे, तनिष्का पतके, गायत्री अंबुले , ईश्वरी गोसावी. तनुजा कडूस , समीक्षा गट, भार्गवी शिरोळे, सोहम दातीर , आदित्य सुंबे, तनिष्का ठुबे.अभिषेक कावरे, शिवराज बढे , सुजल बढे, पियुष डेरे, ज्ञानेश्वरी थोरात, अन्वेश कदम.





