न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे क्रीडा स्पर्धत घवघवीत यश

ओझर : न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ चे क्रीडा स्पर्धत घवघवीत यशपुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे आयोजित गट पातळी क्रीडा स्पर्धत न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ विद्यालयाने घवघवीत यश संपादन केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी दिली. शालेय गुणवत्तेबरोबरच विद्यार्थांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण होऊन राज्य -राष्ट्रिय -आंतर राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
या स्पर्धत विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी करीत जिल्हास्तरावर निवड झाली आहे. कबड्डी स्पर्धत १७ आणि १९ वर्षाखालील मुली संघ जिल्हास्तरासाठी पात्र ठरले आहेत. खो -खो स्पर्धत १७ वर्षाखालील मुले व ४x१०० रिले स्पर्धत १४ वर्षाखालील मुली संघ जिल्हास्तरासाठी पात्र ठरला आहे . कुस्ती स्पर्धसाठी १२ विद्यार्थी जिल्हास्तरासाठी निवड झालेले आहेत.
यामध्ये दिपक फुलमाळी, सोमनाथ बर्डे, मयंक राजपुरे, ओम कदम, दुर्वा पारवे, वेदिका गव्हाणे, शर्वरी नवले, विलास काकडे, रोहित काकडे, मंगेश फुलमाळी, साक्षी पारवे, सुनिल काकडे या स्पर्धकांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. ६०० मी धावणे सोमनाथ बर्डे, २०० मी. धावणे शर्वरी थोरवे, १०० मी धावणे आराध्या थोरवे जिल्हास्तर स्पर्धसाठी पात्र ठरले आहेत. आकाश फुलमाळी, सुजल बोचरे, अश्विनी धोत्रे लांब उडी स्पर्धत विजयी झाले आहेत.
गोळा फेक स्पर्धत गायत्री मोरे, राणी मका तर योगासन स्पर्धत १४ वर्षाखालील आराध्या थोरवे, सिध्दी बोऱ्हाडे, स्वराज थोरवे यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. मार्गदर्शन सुनिल विरणक, शोभा कवडे, तुकाराम निधन यांनी केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक गणेश राऊत, शिक्षक शिक्षकेतर वृंद, समस्त ग्रामस्थ शिरोली बु॥ यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





