भारतासाठी अमेरिकेने मोडली परंपरा, सत्तेत येताच ट्रम्प यांच्या मंत्र्यांची पहिली बैठक एस जयशंकर यांच्यासोबत

India-US Bilateral Ties: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला भारताकडून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर उपस्थति होते. ट्रम्प सत्तेत येताच प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आहे. सत्तेत येताच अमेरिकेकडून भारताल प्राधान्य दिले जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्झ यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत त्यांची पहिली द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय बैठक पार पडली.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत झालेली बैठक महत्त्वाचे असण्याचे कारण म्हणजे सर्वसाधारणपणे अमेरिकेच्या नवीन प्रशासनाकडून शेजारील देश असलेल्या कॅनडा आणि मॅक्सिको किंवा नाटोचे सदस्य असलेल्या देशांना प्राथमिकता दिली जाते. मात्र, यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची पहिली बैठक भारतीय परराष्ट्रमंत्र्यांसोबत झाली.
क्वाडच्या मंत्रीस्तरीय बैठकीनंतर एस जयशंकर आणि मार्को रुबियो यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली. क्वाडच्या बैठकीत अमेरिका, भारतासह जपान आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री देखील सहभागी झाले होते.
Delighted to meet @secrubio for his first bilateral meeting after assumption of office as Secretary of State.
Reviewed our extensive bilateral partnership, of which @secrubio has been a strong advocate.
Also exchanged views on a wide range of regional and global issues.
Look… pic.twitter.com/NVpBUEAyHK
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 21, 2025
एस जयशंकर यांच्यासोबतची बैठक रुबियो यांनी पदभार स्विकारल्यानंतर काहीवेळातच झाली. या बैठकीत भारत-अमेरिका सामरिक भागीदारीबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच, द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्यांवर चर्चा पार पडली. या बैठकीत भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय क्वात्रा देखील उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना जयशंकर यांनी ट्विट करत लिहिले की, मार्को रुबियो यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याशी माझी पहिली द्विपक्षीय बैठक झाली. आम्ही व्यापक द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतला. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आपली मते मांडली.
एस जयशंकर क्वाडच्या मंत्रीस्तरीय बैठकीत देखील सहभागी झाले होते. तसेच, ट्रम्प प्रशासनाचे नवीन राष्ट्रीय सल्लागार माईक वॉल्झ यांचीही त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर आणि जागतिक स्थिरता, समृद्धी वाढवण्यासाठी सहकार्यावर भर देण्यासंदर्भात चर्चा केली.





