ब्रिटनमध्ये परराष्ट्र मंत्र्यांसमोरच ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा ; समाजकंटकांनी घातला गोंधळ

Khalistani Supporters Protest । परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते महत्वपूर्ण बैठक घेणार आहेत. मात्र त्याअगोदर जयशकंर लंडनमध्ये पोहचताच खलिस्तानी दंगलखोरांनी पुन्हा एकदा सर्व मर्यादा ओलांडल्या. लंडनमधील चॅथम हाऊसबाहेर खलिस्तानी दंगलखोरांनी गोंधळ घातला त्यासोबतच जयशंकर त्यांच्यासमोरच खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या.
एका वृत्तसंस्थेनुसार, बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) खलिस्तान समर्थक निदर्शकांनी चॅथम हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. ज्याठिकाणी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चर्चेत भाग घेतला होता. इमारतीबाहेर निदर्शकांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
परराष्ट्र मंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या Khalistani Supporters Protest ।
सध्याच्या ब्रिटन दौऱ्यात, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ५ मार्च रोजी लंडनमधील १० डाउनिंग स्ट्रीट येथे ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा दिल्या. त्यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्याला चालना देण्यावर आणि लोकांमधील देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा केली.
#WATCH | London, UK | Pro-Khalistan supporters staged a protest outside the venue where EAM Dr S Jaishankar participated in a discussion held by Chatham House pic.twitter.com/ISVMZa3DdT
— ANI (@ANI) March 6, 2025
बैठकीनंतर जयशंकर यांनी मंगळवारी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज १० डाउनिंग स्ट्रीट येथे पंतप्रधान केयर स्टारमर यांना भेटून खूप आनंद झाला.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्यावर आणि लोकांमधील देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा झाली. पंतप्रधान स्टारमर यांनी युक्रेन संघर्षावर ब्रिटनचा दृष्टिकोनही मांडला.
परराष्ट्र मंत्री ९ मार्चपर्यंत ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर Khalistani Supporters Protest ।
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र मंत्री जयशंकर ९ मार्चपर्यंत ब्रिटन आणि आयर्लंडच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या काळात ते दोन्ही देशांसोबत भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांना नवीन चालना देण्यासाठी चर्चा करतील. आयर्लंडमध्ये, जयशंकर त्यांचे आयर्लंड समकक्ष सायमन हॅरिस आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांना भेटतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही मूल्ये, सांस्कृतिक संबंध आणि वाढत्या आर्थिक भागीदारीमुळे भारत आणि आयर्लंडमध्ये मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध आहेत.





