Manoj Jarange : मनोज जरांगेंना २४ तासांत दुसरा मोठा धक्का; पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी २४ तासांत दुसरा मोठा धक्का दिला आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा आझाद मैदानावरील आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, परवानगी नाकारली असली तरी मुंबईला जाण्याचा निर्णय बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange)
मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आता एकट्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी पुन्हा पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, दुसऱ्यांदा केलेला अर्जही फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Manoj Jarange)
परवानगी नाकारली, तरी जरांगे मुंबईला जाणार
रविवारी पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांच्या वतीने पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, आज आझाद मैदान पोलिसांनी पुन्हा आंदोलनाची परवानगी नाकारली. (Manoj Jarange)
त्यामुळे आता मनोज जरांगे मुंबईकडे कशा पद्धतीने जाणार आणि त्यांना पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, परवानगी नाकारण्यात आली असली तरी मुंबईत जाऊन उपोषण करण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. (Manoj Jarange)
‘उद्या सकाळी ११ वाजता एकटाच मुंबईला येणार’
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज १७वा दिवस आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी मुंबई दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आपण उद्या सकाळी ११ वाजता एकट्याने मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Manoj Jarange)
‘मुंबईला जायचं ठरलं आहे, त्यात काहीच बदल होणार नाही. वेळप्रसंगी जीव द्यायची वेळ आली तरी चालेल; पण मुंबईला जाण्याचा दिलेला शब्द मागे घेणार नाही. मराठ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. मी अजिबात माघार घेणार नाही,’ अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. (Manoj Jarange)
फडणवीसांवर गंभीर आरोप
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आंदोलनाला रोखण्यासाठी सरकारकडून डाव आखला जात असल्याचा दावा त्यांनी केला. (Manoj Jarange)
‘देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या आडून मराठ्यांवर डाव टाकला. आपल्या रॅलीत घुसून दंगल घडवण्याचा त्यांचा डाव होता,’ असा आरोप जरांगे यांनी केला. (Manoj Jarange)
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता फडणवीस आपल्याला एकट्याला मुंबईत येण्याची आणि आझाद मैदानावर जाण्याची परवानगी देणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Manoj Jarange)
‘आधी मी एकटाच खिंड लढवतो’
‘मी एकटा आधी खिंड लढवतो. आधी एकटा मुंबईत जातो. मुंबईत मराठा समाजाला योग्य वेळी बोलावलं जाईल. तुम्ही तुमच्या गावात सावध आणि सुरक्षित राहा,’ असे आवाहन जरांगे पाटील यांनी समर्थकांना केले. (Manoj Jarange)
तसेच सण-उत्सवाचा काळ असल्याने परिस्थितीनुसार निर्णय बदलावे लागतात. मात्र, निर्णय फक्त समर्थकांनी मुंबईत येण्याबाबत बदलला असून मुंबईला जाण्याच्या आपल्या निर्णयात कोणताही बदल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Manoj Jarange)
आता पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार असल्याने पुढील काही तासांत काय घडते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange)
Manoj Jarange : पाणी, सलाईनही आजपासून बंद; मृत्यू स्वीकारेन, पण माघार घेणार नाही : मनोज जरांगे




