SCO Summit 2026: “शी जिनपिंग, पुतिन अन् पंतप्रधान मोदी…” ; तीन महान नेत्यांमध्ये झाली सौहार्दपूर्ण भेट, भेटीत नेमकं काय झालं ?
SCO Summit 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी एकमेकांची विचारपूस केली.

SCO Summit 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींची जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोघांसोबतही अत्यंत सौहार्दपूर्ण भेट झाली.
याचा एक खास व्हिडिओ देखील समोर आला आहे. या भेटीदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ काही अंतरावर उभे राहून हे दृश्य पाहत होते.
एससीओ शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सर्व देशांच्या नेत्यांनी एकत्र फोटोसेशन केले. यादरम्यान, पुतिन आणि जिनपिंग यांनी सभागृहात पंतप्रधान मोदींकडे जाऊन सौहार्दपूर्णपणे हस्तांदोलन केले.
शाहबाज शरीफ देखील त्या तिघांकडे पाहत होते. मात्र, पंतप्रधान आणि शाहबाज यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
#WATCH | Kyrgyzstan: Prime Minister Narendra Modi meets Chinese President Xi Jinping and Russian President Vladimir Putin at the 26th Shanghai Cooperation Organisation (SCO) Summit in Bishkek.
(Source: Russian Pool via Reuters) pic.twitter.com/qTRBmlIOFF
— ANI (@ANI) September 1, 2026
पंतप्रधान मोदींनी दहशतवादावर जोरदार टीका केली SCO Summit 2026:
पंतप्रधान मोदींनी एससीओच्या व्यासपीठावरून दहशतवादाविरोधात एकजुटीचे आवाहन केले. ते म्हणाले, “दहशतवाद अजूनही संपूर्ण मानवतेसमोर एक गंभीर आव्हान उभे करतो.” याविरुद्धच्या लढ्यात आपण केवळ कृती-प्रतिक्रिया या दृष्टिकोनापुरते स्वतःला मर्यादित ठेवू शकत नाही. आपल्याला दहशतवादी वित्तपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थानांची संपूर्ण परिसंस्थाच मोडून काढावी लागेल.
पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानबद्दल काय म्हणाले? SCO Summit 2026:
पंतप्रधान मोदी म्हणाले, “शांततापूर्ण आणि सुरक्षित युरेशियासाठीची आपली सामायिक आकांक्षा ही अफगाणिस्तानमधील शांतता आणि स्थिरतेशी देखील जोडलेली आहे. भारत अफगाणिस्तानच्या लोकांच्या विकासासाठी आणि मानवतावादी मदतीसाठी योगदान देत आला आहे आणि यापुढेही देत राहील.”





