गणवेश वाटप न करणाऱ्या शाळा कचाट्यात
Updated On:

पुणे, – शासनाकडून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे वाटप करण्याची योजना जाहीर करण्यात आली. मात्र बहुसंख्य शाळांनी हे साहित्यच वाटप केले नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शासनाने शाळांना हे साहित्य खरेदी करण्यासाठी निधीही उपलब्ध करुन दिला आहे. या प्रकरणात संबंधित शाळांवर कारवाई करावी लागणार आहे, अशा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
शिक्षकांच्या पगार, पेन्शन, वेतनेत्तर अनुदानासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. त्यामुळे शिक्षकांना काही शासकीय कामे करावीच लागणार आहे. जनगणना, निवडणूक संबंधीची कामे, विविध प्रकारची सर्वेक्षणे या कामांना अशैक्षणिक कामे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी ठामपणे मांडले आहे.
शिक्षणमंत्री म्हणाले…
- पुस्तकांचे ओझे कमी व्हायलाच पाहिजे; शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात येणे आवश्यक.
- विद्यार्थ्यांची हजेरी स्वयंचलित पद्धतीने होणार
- 3परीक्षांचे निकाल काही सेकंदात ऑनलाइन लावणार
- 30 हजार शिक्षकांची भरती होणारच
- पाचवी व आठवीसाठी यंदापासून वार्षिक परीक्षा होणार




