School Holidays 2025 : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; फेब्रुवारी महिन्यात असणार तब्बल ‘इतक्या’ दिवस शाळा बंद !

School Holidays 2025 : जानेवारी महिना संपला असून आज पासून नवीन महिन्याला सुरुवात झाली आहे. आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच, दि. १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे देशातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित सर्वच गोष्टींवर याचा थेट परिणाम होणार आहे.
दरम्यान, असं असलं तरी या चालू महिन्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे या महिन्यात पालक आणि विद्यार्थी विकेंडचा चांगला एन्जॉय करू शकतील. फेब्रुवारी महिन्यात शाळेला किती सुट्ट्या मिळणार? हे जाणून घेऊया.
वसंत पंचमीने फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होतेय. शनिवार 1 फेब्रुवारीला असणारा हा सण हा हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक सण असून तो 2 फेब्रुवारीला साजरा केला जाईल. संत गुरु रविदास यांची जयंती 12 फेब्रुवारीला आहे. या दिवशी बुधवार असून यानिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असेल.
रविदास जयंतीनंतर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाणार आहे. यादिवशी शाळा, कॉलेजला सुट्टी असेल. 26 फेब्रुवारी, बुधवारी महाशिवरात्रीची सुट्टी असेल.
याशिवाय 2 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने शाळांना सुट्टी असेल. काही शाळांना शनिवारीदेखील सुट्टी असते. राज्यांच्या सुट्ट्या या संबंधित राज्याप्रमाणे बदलू शकतात. त्यामुळे एखादी सुट्टी महाराष्ट्रात असेल तर ती सुट्टी इतर राज्यात असेलच असे नाही.





