SBI Users Alert : देशातील सर्वात मोठ्या बँकेचे ग्राहकांना अलर्ट; महत्त्वाची सेवा राहणार बंद
SBI Users Alert : जर तुम्ही तुम्ही इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे पेमेंट करत असाल, तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

SBI Users Alert : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना अलर्ट देण्यात आला आहे.
जर तुम्ही तुम्ही इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगद्वारे पेमेंट करत असाल, तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण आज ११ एप्रिल २०२६ काही तांत्रिक अडचणींमुळे बँकेचं अॅप बंद राहणार आहे. SBI Users Alert
नियोजित देखभालीच्या कामामुळे OTP-आधारित सेवांमध्ये काही वेळ अडथळे येण्याची शक्यता आहे, अशी माहिती बँकेने दिली आहे.
यामुळे इंटरनेट बँकिंग, YONO Lite आणि YONO सेवांच्या काही सुविधा काही काळासाठी विस्कळीत राहतील. रात्री २:३० ते २:५० या २० मिनिटांच्या कालावधीत ही देखभाल प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्यानंतरही काही काळ अडचण येण्याची शक्यता आहे. SBI Users Alert
बँकेने स्पष्ट केले आहे की, जरी ओटीपी आधारित सेवांमध्ये अडथळा असला तरी, ग्राहकांना अखंडित सेवेसाठी, पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येईल. यूपीआय व्यवहार सुरू राहतील.
ओटीपी ऐवजी ‘एसबीआय ऑथेंटिकेटर’चा वापर करून व्यवहार पूर्ण करता येतील. यात प्रॉम्प्ट, QR कोड किंवा ॲप-आधारित OTP चा समावेश असतो, हे SMS OTP चा सुरक्षित आणि आधुनिक पर्याय आहे. SBI Users Alert
हेही वाचा:






