SBI shares drop: एसबीआयच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची घसरण; बाजारमूल्यात 66691 कोटींची घट
SBI shares drop: चौथ्या तिमाहीतील आर्थिक निकाल गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार न आल्याने देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शेअर्समध्ये शुक्रवारी जवळपास ७ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे बँकेच्या बाजारमूल्यात तब्बल ६६,६९१.२ कोटी रुपयांची घट झाली आहे.

SBI shares drop: चौथ्या तिमाहीतील आर्थिक निकाल गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार न आल्याने देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शेअर्समध्ये शुक्रवारी जवळपास ७ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे बँकेच्या बाजारमूल्यात तब्बल ६६,६९१.२ कोटी रुपयांची घट झाली आहे.
बीएसईवर एसबीआयचा शेअर ६.६२ टक्क्यांनी घसरून १,०१९.५५ रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ७.३७ टक्क्यांपर्यंत घसरत १,०११.३० रुपयांवर पोहोचला होता. एनएसईवरही शेअर ६.६५ टक्क्यांनी घसरून १,०१९.३० रुपयांवर बंद झाला. या घसरणीमुळे बँकेचे बाजारमूल्य ९,४१,१०७.६२ कोटी रुपयांवर आले आहे.
एसबीआयने मार्च २०२६ अखेरच्या चौथ्या तिमाहीत स्वतंत्र निव्वळ नफ्यात ६ टक्क्यांची वाढ नोंदवत १९,६८४ कोटी रुपयांचा नफा जाहीर केला. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत बँकेला १८,६४३ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
तथापि, बँकेचे एकूण उत्पन्न घटले असून ते १,४०,४१२ कोटी रुपयांवर आले. मागील वर्षी याच तिमाहीत हे उत्पन्न १,४३,८७६ कोटी रुपये होते. मात्र व्याज उत्पन्नात वाढ होऊन ते १,२३,०९८ कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षी हे उत्पन्न १,१९,६६६ कोटी रुपये होते.
हेही वाचा – रुपया 25 पैशांनी घसरून 94.47 च्या पातळीवर; पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम
बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा झाली असून सकल अनुत्पादित कर्जांचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण १.८२ टक्क्यांवरून १.४९ टक्क्यांवर आले आहे. तसेच निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.४७ टक्क्यांवरून ०.३९ टक्क्यांपर्यंत कमी झाले.
एकत्रित पातळीवर एसबीआयचा निव्वळ नफा किरकोळ वाढीसह १९,६४३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी तो १९,६०० कोटी रुपये होता. तर एकत्रित एकूण उत्पन्न १,८१,०७९ कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; प्रतिक्विंटल 1500 रुपयांच्या अनुदानाची मागणी





