एकच नंबर! SBI ने सुरू केली नवीन योजना, दरमहिना फक्त 250 रुपये गुंतवा अन् मिळवा 17 लाख

SBI Investment Scheme | दरमहिन्याला उत्पन्नातील काही रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवायला हवी, असा सल्ला नेहमी दिला जातो. अनेकदा खर्चामुळे बचतीसाठी पैसेच शिल्लक राहत नाही अशी अनेकांची तक्रार असते. मात्र, तुम्ही दरमहिन्याला फक्त 250 रुपये गुंतवणूक करून निवृत्तीनंतर 17 लाख रुपये मिळवू शकता.
एसबीआयने खातेधारकांसाठी एक नवीन एसआयपी योजना सुरू केली आहे. निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो. एसबीआयची ही नवीन एसआयपी योजना नक्की काय आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
एसबीआयची जननिवेश एसआयपी योजना
एसबीआयद्वारे खातेधारकांसाठी जननिवेश एसआयपी योजनासुरु करण्यात आली आहे. प्रामुख्याने ग्रामीण, निम-शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. एसबीआय म्युच्युअल फंड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने मिळून ही योजना सुरु केली आहे.
एसबीआय जननिवेश एसआयपी योजनेमध्ये अगदी 250 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. खातेधारक गुंतवणुकीसाठी दैनिक, साप्ताहिक आणि मासिक पर्याय निवडू शकतात. तुम्ही जर नियमितपणे या योजनेत गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.
दरमहिना गुंतवा 250 रुपये
एसबीआयच्या या योजनेत तुम्ही दरमहिन्याला 250 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. समजा, तुम्ही दरमहिन्याला 250 रुपये गुंतवणूक केली, तर 30 वर्षांनी एकरकमी 17.30 लाख रुपये मिळू शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला दरवर्षी 15 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळणे आवश्यक आहे. दरवर्षी सरासरी 15 टक्के परतावा मिळाल्यास 30 वर्षांनी एकूण मुद्दल 90 हजार आणि त्यावरील परतावा 16,62,455 रुपये असेल.
अशाप्रकारे, 40 वर्ष गुंतवणूक केल्यास तुम्हाला 78 लाख रुपये मिळतील. नियमितपणे गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. मात्र, परतावा हा बाजारातील चढउतारांवर अवलंबून आहे. तुम्ही जर नियमित गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असाल तर एसयबीआयच्या या योजनेचा विचार करू शकता.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





