Sayli Kamble Welcomes Baby Boy: गायिका सायली कांबळे झाली आई; घरी चिमुकल्या बाळाचं आगमन

Sayli Kamble Welcomes Baby Boy : ‘इंडियन आयडल’ फेम लोकप्रिय गायिका सायली कांबळे आई झाली आहे. सायलीच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं असून तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी सायलीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली.
सायलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,
“एक छोटासा चमत्कार, आयुष्यभराचं प्रेम… आम्हाला मुलगा झाला आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद.”
सायलीला १२ डिसेंबर २०२५ रोजी मुलगा झाला.
View this post on Instagram
सायली व तिचा पती धवल पाटील यांनी लग्नानंतर जवळपास तीन वर्षांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. सायलीने काही महिन्यांपूर्वी आपण गरोदर असल्याची माहितीही सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी आणि कलाकार मित्रमैत्रिणींनी सायलीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सायली कांबळे ‘इंडियन आयडल १२’ या सीझनमधून घराघरात पोहोचली. आपल्या सुमधुर आवाजामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सायली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
दरम्यान, सायलीने २४ एप्रिल २०२२ रोजी बॉयफ्रेंड धवल पाटीलसोबत लग्न केले होते. आता दोघांच्याही आयुष्यात आई-बाबा होण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.





