पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर झाले आहे. त्यात देशातील राज्य सार्वजनिक विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
पहिल्या क्रमांकवर चेन्नई येथील अण्णा युनिव्हर्सिटी व दुसऱ्या क्रमांकावर कलकत्ता येथील जादवपूर विद्यापीठाचा क्रमांक आहे. दरम्यान, देशातील विद्यापीठ गटात पुणे विद्यापीठाचे मानांकन घसरले आहे.
सर्वसाधारण गटात पुणे विद्यापीठाने ३७ वे स्थान, तर विद्यापीठ गटातून २३ वा क्रमांक मिळवला आहे.
केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्य शिक्षण मंत्री सुकांता मुजुमदार, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव के. संजय मूर्ती, यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, एआयसीटीईचे अध्यक्ष टी.जी. सीतारामन, “एनबीए’ अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची घोषणा करण्यात आली.
तसेच याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी यावेळी विद्यापीठाचे रँकिंग स्वीकारले.
देश पातळीवरील स्टेट युनिव्हर्सिटी कॅटेगिरीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनात केलेल्या कामगिरीमुळे देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे.
विद्यापीठाच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वाचे योगदान आहे. – प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे





