Video | डिंभा कालव्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

Updated On:
Video | डिंभा कालव्यात पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

नारायणगाव (प्रतिनिधी) -येथील येडगाव नारायणगाव शिवेवर अंबादास उर्फ लक्ष्मण दत्तात्रय वाजगे यांच्या शेताजवळ असलेल्या डिंभा डाव्या कालव्यामध्ये सुमारे एक ते दीड महिने वयाच्या बिबट्याचा बछडा येथील शेतमजूर देविदास लहानु केदार यांना आढळला.

आज (सोमवारी) सकाळी शेतावर कामाला जात असताना देविदास केदार यांना बिबट्याच्या बछड्याचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी कॅनॉलमध्ये उतरून पाहिले असता त्यांना हा बछडा पाण्यात भिजलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तात्काळ वन विभाग व बिबट रेस्क्‍यू टीमचे सदस्य किरण वाजगे यांना फोन करून याबाबत माहिती दिली.

यानंतर येथील रेस्क्‍यू टीम चे सदस्य किरण वाजगे व रमेश सोलाट यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या बछड्याला ताब्यात घेऊन येथील वनपाल मनीषा काळे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी स्थानिक रहिवासी व नागरिकांना बिबट्याबरोबर सेल्फी व फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

यावेळी वनपाल मनिषा काळे यांनी या बछड्याला सिरींजने पाणीदेखील पाजले. व माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रामध्ये या बछड्याला पुढील उपचारासाठी दाखल केले.
याप्रसंगी स्थानिक शेतकरी अंबादास वाजगे, संदीप वारुळे, महेंद्र डोके, लहानु केदार, विघ्नहर वाजगे, शिवा कोल्हे, अरुण भुजबळ, वनकर्मचारी खंडू भुजबळ, विश्वास शिंदे, सृष्टी वाजगे, ओम वाजगे, अगस्त्य वाजगे आदी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

बरोबर पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी वाजगे यांच्या उसाच्या शेतामधून दोन बिबट्याचे बछडे खेळत खेळत येथील शेतमजुरांच्या अंगणात आले होते. तसेच काल (रविवारी) रात्री एक बिबट्याचा बछडा वाजगे यांच्या शेतापासून शंभर मीटर अंतरावर आढळला होता. अशा पद्धतीने बिबट्या आणि मानव हे एकत्रितरीत्या जुन्नर तालुक्‍याच्या विविध भागात आता सातत्याने पाहायला मिळत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

lifestyle : रात्री झोपण्यापूर्वी बिछाना व्यवस्थित करणे का महत्त्वाचे ठरते? तुमच्या आयुष्यावर काय परिमाण घडतो? पाहा....

2026-02-10 22:30:32

lifestyle : रात्री झोपण्यापूर्वी बिछाना व्यवस्थित करणे का महत्त्वाचे ठरते? तुमच्या आयुष्यावर काय परिमाण घडतो? पाहा....

Pune News : पोलीस हवालदाराने गळफास घेऊन जीवन संपवले

2025-07-20 18:36:01

Pune News : पोलीस हवालदाराने गळफास घेऊन जीवन संपवले

आयुष्य तुरुंगात घालवून निर्दोष? नुकसान भरपाई द्या ना..! सर्वोच्च न्यायालनेच विचारला सर्वात मोठा प्रश्न

2025-07-16 20:03:38

आयुष्य तुरुंगात घालवून निर्दोष? नुकसान भरपाई द्या ना..! सर्वोच्च न्यायालनेच विचारला सर्वात मोठा प्रश्न

Pune District : जीवनासाठी उपयोगी ठरणारेच शिक्षण घ्या

2025-07-06 08:25:13

Pune District : जीवनासाठी उपयोगी ठरणारेच शिक्षण घ्या

पुणे जिल्हा : अनुष्काने दिले बुडणाऱ्या तरूणाला जीवदान

2025-06-01 09:12:05

पुणे जिल्हा : अनुष्काने दिले बुडणाऱ्या तरूणाला जीवदान