Pune District : जीवनासाठी उपयोगी ठरणारेच शिक्षण घ्या

– माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन
मंचर – आपल्या देशात व राज्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपण जे शिक्षण घेतो त्याचा उपयोग आपल्याला नोकरीसाठी होतो का ? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. पारंपारिक पद्धतीने शिक्षण घेण्यापेक्षा जे आपल्या जीवनासाठी उपयुक्त शिक्षण आहेत. ते घेणे महत्त्वाचे आहे,असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवार, दि.५ रोजी व्यक्त केले.
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तसेच आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव तालुक्यात विविध शाळा,महाविद्यालयात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान कार्यक्रम शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या सहसचिव पूर्वाताई वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, जेष्ठ नेते सुभाषराव मोरमारे, गणपतराव इंदोरे, भैरवनाथचे उपाध्यक्ष सागर काजळे, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले,
दौलतभाई लोखंडे, सचिन पानसरे,ए. एफ. इनामदार, दादाभाऊ पोखरकर, गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर,आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद बोंबले, उपाध्यक्ष सुनील वळसे पाटील,अनिल देसले,प्राचार्य कांताराम टाव्हरे,प्रा.अरुण गोरडे,अविनाश ठाकूर,प्रेम थोरात,शिवराज निघोट यांच्या सह विविध संस्थाचे पदाधिकारी,मुख्याध्यापक, शिक्षक,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले.त्यांचा सत्कार, सन्मान झाला. मात्र, त्यांनी त्यांचे पाय जमिनीवर ठेवणे गरजेचे आहे. युवा नेत्या पूर्वाताई वळसे पाटील म्हणाल्या, चांगले गुण मिळवणे म्हणजे शिक्षण नाही.तर स्वतःला घडवणे.स्वतःची वेगळी ओळख जगात निर्माण करणे म्हणजेच शिक्षण आहे.विद्यार्थ्यांनी विविध शिक्षण घेत असताना सोशल मीडियाचा वापर करणे देखील गरजेचे आहे.
प्रमोटर डीजीसॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश मेहकरयांनी मनोगत व्रुक्त केले. मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुनील वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर, निलेश पडवळ,केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन केले. राजू आढळराव यांनी आभार मानले.





