“मुंबईला वाचवा, जमीन गौतम अदानींच्या घशात घातली जातेयं”; विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

Vijay Wadettiwar| विधीमंडळातील पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विविध मुद्दयांवरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच आज सभागृहात मुंबईतील जमिनी उद्योजक गौतम अदानी यांच्या घशात घातल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा, असे आवाहन करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
अधिवेशनात विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘मुंबई बिल्डरच्या घशात घातली जात आहे. कुर्ल्याची दुग्धविकास खात्याची जागा अदानींना दिली जात आहे. ही एकूण ८.५ हेक्टर जागा आहे. ही जमीन गौतम अदानींच्या घशात घातली जात आहे. जमिनीची मूळ किंमत २० कोटींची आहे. तरीही रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दराने जमीन दिली गेली. महाराष्ट्राला फसवलं जात आहे. ही जमीन देण्यास विरोध केल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली केली. मुंबईला वाचवा, अदानी पूर्ण मुंबई साफ करत आहेत. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत.याची चौकशी करण्याची गरज आहे,’ अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.
“कुर्ला येथील दुग्ध शाळेची जमीन साडे आठ हेक्टर आहे. 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी ही जमीन पशुसंवर्धन विभाग ते महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरीत केली गेली. हे हस्तांतरण एकाच दिवसात झाले. इतकी तप्तरता कशी असा सवाल त्यांनी केला. सदर जमिनीचे मूल्यांकन किती आहे? जमिनीवरील एफएसआय चे मुल्याकंन किती होते?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा:





