मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले,’शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार…’

तर आज वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) चर्चाही केली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत हेही यावेळी मातोश्रीवर होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण लोकसभा निवडणुकांपूर्वीच संजय राऊत यांनी सुद्धा वसंत मोरेंना फोन करुन शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. अशात आता ते शिवसेनेत प्रवेश करणार का असा प्रश्न चर्चेत आला आहे.
या चर्चांवर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,’आता पक्ष प्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल. मी वंचित मध्ये गेलो होतो. मात्र, मतदारांनी मला स्वीकारलं नाही. या अगोदर मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडव आव्हान देऊ असेही मोरेंनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले. मला दोन पर्याय आहेत, खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून मी विधानसभा लढू शकतो. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता, तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, 10 नगरसेवक आहेत, असेही मोरेंनी म्हटले.




