Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचे विधान अन् भाजपचे प्रत्युत्तर; ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेची भारताशी जोड केल्याने वाद
Vijay Wadettiwar : "ज्याप्रमाणे अमेरिकेत घटना घडल्या, अगदी तसाच घटनाक्रम सध्या भारतातही सुरू आहे"

Vijay Wadettiwar : काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर भाजपकडून टीका केली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारच्या घटनेवरुन वडेट्टीवार यांनी भारतातील राजकारणावरुन टिप्पणी केली होती. ज्यामुळे आता राजकीय वाद सुरू झाला आहे.
ट्रम्प यांच्यावर गोळी झाडलीच जाणार होती, तसाच राग भारतातही आहे, भारतातील सद्यस्थिती ही अमेरिकेतील परिस्थितीशी मिळतीजुळती आहे, असं अत्यंत चुकीचं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट निर्माण झाली. यावरून भाजपने वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधत हायकमांडला खूश करण्यासाठी ते चुकीची वक्तव्य करत असल्याचा टोला लगावला. Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे विश्लेषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, “जसे पेराल, तसे उगवेल, आपल्या कर्मांची फळे प्रत्येकालाच भोगावी लागतात.
ट्रम्प यांनी सत्तेत असताना आणि सर्वोच्च पदावर असताना संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने अनेक राष्ट्रांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच अहंकारातून आणि चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकन जनतेत असंतोष निर्माण झाला आणि त्याचेच रुपांतर या हल्ल्यात झाले आहे.”
विजय वडेट्टीवार यांनी भारतातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, “ज्याप्रमाणे अमेरिकेत घटना घडल्या, अगदी तसाच घटनाक्रम सध्या भारतातही सुरू आहे. अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत.
मात्र, भारतात सध्या तशी आंदोलने दिसत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना वाटते की ‘सर्व काही आलबेल’ आहे. परंतु, प्रत्यक्षात लोकांच्या मनात मोठा असंतोष असून, भारत देशही विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी भावना जनतेत आहे.” Vijay Wadettiwar
Rahul Gandhi will reward him
Anybody who abuses PM Modi, gives him death threats rises up quickly in jihadi congress https://t.co/pr8cBBWira
— Shehzad Jai Hind (Chowkidar as per INC ecosystem) (@Shehzad_Ind) April 27, 2026
भाजपकडून टीका
दरम्यान, वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप पोस्ट करत भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसने राजकीय टीकेची मर्यादा ओलांडून या हल्ल्याचे समर्थन केले असल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करता करता काँग्रेस आता देशाच्या विरोधात जात आहे.” त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं उदाहरण देत तिथल्या गोळीबारातचा भारतासोबत संबंध जोडून वाद ओढावून घेतला आहे. Vijay Wadettiwar
हेही वाचा:
Madhuri Misal : अतिक्रमणं आणि बेकायदा होर्डिंग्ज हटवा; मंत्री माधुरी मिसाळ यांचे प्रशासनाला कडक आदेश






