Bandhu Film: ‘#Save बंधू’! मराठी चित्रपटासाठी संघर्ष सुरूच, दिग्दर्शकाची भावनिक साद
Bandhu Film: महाराष्ट्र शासनाला दिग्दर्शकाची विनंती

Bandhu Film: अभिनेता उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची मुख्य भूमिका या असलेला बंधू (Bandhu )हा सिनेमा 20 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी सुद्धा यासिनेमाचं भरभरून कौतुक केलं. उत्कृष्ट कथानक असूनही या मराठी सिनेमाला आपल्याच महाराष्ट्रात शो साठी वणवण करावी लागते आहे. अनेक थिएटरमधूनही या सिनेमाचे शोज कमी करण्यात आले आहेत. (Bandhu Film)
याप्रकरणी ‘बंधू’ सिनेमाचे दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत भावनिक आवाहन केले आहे. ‘बंधू’च्या दिग्दर्शकांनी ‘ सेव्ह बंधू’ (Save Bandhu )ही चळवळ सुरू करण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. (Bandhu Film)
व्हिडिओत दिग्दर्शक नितीन सुपेकर म्हणाले, “नमस्कार, मी ‘बंधू’ सिनेमाचा लेखक-दिग्दर्शक नितीन सुपेकर. मी तसा फार मीडियासमोर येत नाही. पण, आज मला माझ्या सिनेमासाठी तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे. आम्ही अनेक थिएटर व्हिजिट करत आहोत आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतोय. महाराष्ट्रात जिथे-जिथे सिनेमा पाहिला जातोय, तिथून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. (Bandhu Film)
पण, रात्री १० वाजता माझ्या फोनवर मेसेज आला की, महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांमधून हा सिनेमा कमी करण्यात आला आहे. अतिशय कमी ठिकाणी हा सिनेमा सुरू आहे. मला कळतच नव्हतं की, प्रेक्षकांचा प्रतिसाद खोटाय, आमचे प्रयत्न खोटे आहेत की, आम्ही अजून कुठे कमी पडतोय? अर्थात प्रमोशनला कमी पडतोय हे मराठीच्या बाबतीत घडतंच आहे. कारण, तेवढा पैसा निर्माते लावू शकत नाहीत. मात्र आता माझा सिनेमा मी असा सहजासहजी सोडणार नाही.” (Bandhu Film)
View this post on Instagram
“मी या सिनेमावर २०२४ पासून म्हणजेच तीन वर्ष खूप मेहनत घेतलीये. आता ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय, त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकू शकता की, खरंच सिनेमा खूप सुंदर झालाय. माझ्या सर्व कलाकारांनी, तंत्रज्ञांनी यासाठी १०० टक्के योगदान दिलं आहे. पण, हे अचानक मोठे सिनेमे समोर आल्यावर आपला मराठी सिनेमा अलगद माशीसारखा बाजूला काढून टाकणं, हे जरा मला पटत नाही. मला मान्य आहे की, मराठीत एकाच वेळी अनेक सिनेमे आलेत. पण, शेवटच्या स्क्रीनपर्यंत मी या ‘बंधू’ सिनेमासाठी झगडत राहीन,प्रयत्न करेन. हा सिनेमा थिएटरमध्ये बघा…टेलिव्हिजनवर येण्याची वाट पाहू नका.” (Bandhu Film)
“अगदी कालच रात्री मला एक मेसेज आला होता, ज्यामध्ये एका गृहस्थाने त्याच्या तमिळ, MP मधील आणि एका मालवणी-गुजराती मित्राला ‘बंधू’ दाखवला. त्यांचं म्हणणं होतं की, तुमचा सिनेमा पाहून आम्ही भारावून गेलो होतो. खरंच, आमच्या सिनेमात खूप ताकद आहे. आता जेवढ्या ठिकाणी हा सिनेमा सुरू आहे. तिथे मी आवर्जून जाणार आहे. (Bandhu Film)
आता जेवढे महाराष्ट्रात रंगकर्मी आहेत, त्यांना मी विनंती करतो की, तुम्ही एक-एक पोस्ट शेअर केली, तर अजूनही हा सिनेमा पोहोचेल. हळुहळू हा सिनेमा पुढे जाईल. महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी विनंती करतो की, हा असा सिनेमा आहे. ज्यामुळे समाजमन सुधारेल. भाऊ-भाऊ एकत्र येतील, समाजातील हिंसा कमी होईल. त्यामुळे हा सिनेमा घराघरांत पोहोचला पाहिजे. याशिवाय जे प्रेक्षक हा सिनेमा पाहून गेले, त्यांनीही इतरांना सांगा. महाराष्ट्रभर जर आपण #Save बंधू ही चळवळ चालवली. तर प्रेक्षक नक्कीच सिनेमागृहात येतील.” (Bandhu Film)
“तुमच्या एका पोस्टमुळे मला पीआरची गरज न भासता सर्व लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचेल. प्रयत्न न करता मी हरणार नाही. मी माझं काम चोख केलंय. आता या प्रयत्नांना तुमच्या साथीची गरज हवीये. #SAVEबंधू” असं आवाहन नितीन सुपेकर यांनी प्रेक्षकांना केलं आहे. (Bandhu Film)
हेही वाचा:





