अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारे युवा नेतृव सत्यशिल शेरकर : शरद लेंडे

ओझर – जुन्नर तालुक्यात पाच धरणे शरद पवार यांच्यामुळेच झाली आहेत. आदीवासी समाजाचे प्रश्न फक्त शरद पवारच सोडवू शकतात. आदीवासी भागात जेव्हा जेव्हा पाणी टंचाई जाणवली, तेव्हा पाण्याच्या टाक्या तसेच आणे -पठार भागावर उन्हाळ्यात जनावरांसाठी चारा श्री विघ्नहर कारखान्याच्या वतीने वेळोवेळी उपलब्ध करून दिला आहे. म्हणून अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारे युवा नेतृव, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी बल्लाळवाडी येथे व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्या प्रचारानिमित्त बल्लाळवाडी येथील मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी उमेदवार सत्यशिल शेरकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले, प्रसन्न डोके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, माजी नगराध्यक्ष सुनिल मेहेर, सुरेखा वेठेकर, अशोक सोनवणे, सरपंच शितल फोडसे, दिनकर नलावडे, वंदना हुळवळे, ऋषी शिंदे, अजीत सिंहाने, रविंद्र गुंजाळ, गणेश गुंजाळ आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
लेंडे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात शेतक-यांवर नेहमीच अन्याय झाला असून शेतीच्या कुठल्याही पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. या सरकारने एकीकडे लाडकी बहिण योजना म्हणून पंधराशे रुपये दिले तर दुसरीकडे लगेच महागाई वाढवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातल्या या सरकारला घरी बसवण्याची हिच वेळ असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांना विजयी करण्याचे आवाहान त्यांनी केले.
उमेदवार सत्यशिल शेरकर म्हणाले की, गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत आदीवासी भागात जेव्हा पाणी टंचाई निर्माण झाली तेव्हा पाण्याच्या टाक्या पुरवण्याचे काम केले आहे, भविष्यात या परीसरात पाणी टंचाई कशी दूर होईल याकडे आपण प्राधन्य देणार आहे. तसेच या परीसरातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी आदीवासी नेते रायबाशेठ घोगरे म्हणाले की, आलमे हे गाव आदिवासी भागात मोडत असल्याने या भागात कायम पाणी टंचाई जाणवत असते. पहिल्या लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली परंतू कामे केली नाही, त्यामुळे आम्ही यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांनाच मतदान करून आदीवासी समाज हा सत्यशिल शेरकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.





