शनिवार-रविवार लॉकडाऊनचा निर्णय तूर्तास नाही : राव

विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांची माहिती
पुणे – गर्दी टाळण्यासाठी शनिवारी, रविवारी लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात अजून निर्णय झाला नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या शहरातील दुकाने पी 1, पी2 नुसार उघडत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द झाल्यानंतर शनिवार आणि रविवारी दुकाने बंद करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केल्याचे राव यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी आठवड्यातील दोन दिवस म्हणजे शनिवार-रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तरी पुढे ढकलण्यात आला आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने याआधीच स्पष्ट केले आहे. मात्र गर्दी कशी टाळता येईल, यावर नवीन विचार सुरू आहे. शहर व जिल्ह्यातील गर्दीचे ठिकाण तपासून कायमस्वरुपी उपाययोजना केली जाणार आहे.





