Gokul Politics : मी पाटील आहे, विधानसभेला मैदानात या’; सतेज पाटलांचा पलटवार
Gokul Politics : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याला काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज (बंटी) पाटील यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

Gokul Politics : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर कोल्हापुरातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. समविचारी आघाडीचे प्रमुख आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. “सरकारी यंत्रणेत राहून धमक्या देऊ नका. मी पाटील आहे, लढायचे असेल तर मैदानात या. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढूया,” असे खुले आव्हान त्यांनी दिले. (Gokul Politics)
‘धमकी द्यायची असेल तर मैदानात या’
पत्रकार परिषदेत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून चंद्रकांत पाटील आणि आमच्यात राजकीय लढाई सुरू आहे. स्वर्गीय डी. वाय. पाटील यांच्याबद्दल बोलताना योग्य-अयोग्य याचे भान ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सुनावले. (Gokul Politics)
“चंद्रकांत पाटील, आता तुमचाही काचेचा बंगला आहे. सरकारी यंत्रणेत राहून धमक्या देऊ नका. मला संपवतो, उद्ध्वस्त करतो असे सांगण्यापेक्षा मैदानात या. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढूया,” अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला. (Gokul Politics)
‘न्यायालयीन लढाईत आम्हाला यश मिळेल’
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीने बहुमताचा अनादर करू नये, असे आवाहनही सतेज पाटील यांनी केले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कथित ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत त्यांनी सरकारी यंत्रणेच्या वापराबाबत टीका केली. राज्यात अध्यादेश काढून कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो, असा आरोप करत न्यायालयीन लढाईत आपल्याला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Gokul Politics)
धनंजय महाडिकांनाही प्रत्युत्तर
भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरही सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. २०२७ असो किंवा २०२९, निवडणुकीच्या वेळी योग्य निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी महाडिकांना लक्ष्य केले. (Gokul Politics)
“सारिपाटावरचे डाव कसे खेळायचे, हे मला चांगले ठाऊक आहे,” असे म्हणत त्यांनी महाडिकांना त्यांच्या साखर कारखान्यातील थकीत बिलांच्या मुद्द्यावरूनही सुनावले. कारखान्याची बिले थकली असून साखर जप्त करण्याची वेळ आल्याचा दावा त्यांनी केला. (Gokul Politics)
‘तीन महिन्यांनंतर चार शासननियुक्त संचालक राहणार नाहीत’
गोकुळमधील पुढील घडामोडींवर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, संस्थेत जे चांगले असेल त्याला पाठिंबा दिला जाईल आणि चुकीच्या गोष्टींना विरोध केला जाईल. तीन महिन्यांनंतर चार शासननियुक्त संचालक राहणार नाहीत आणि त्यानंतर त्यांच्या जागी पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Gokul Politics)
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या सत्तासंघर्षाला न्यायालयीन लढाईत कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Gokul Politics)





