Satara ZP Election 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. त्यानुसार आता निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी 67.80 टक्के मतदान केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सातारा जिल्हा परिषद निवडणूक लढवली. तर भाजपने देखील येथे मोठी तयारी केली होती. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ६५ निवडणूक विभाग आहेत. Pune ZP election results 2026 : पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर समोर आलेल्या निकालानुसार, भाजप ३२, राष्ट्रवादी १८ तर शिंदेंची शिवसेना येथे १० जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. Satara ZP Election 2026: सातारा तालुका पाटखळ गट शुभांगी जाधव विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस) गौरी नलावडे पराभूत (भाजप) सातारा तालुका- लिंब गट लिंब गटातून तीनही भाजपचे उमेदवार विजयी लिंब गटातून सर्जेराव सावंत विजयी लिंब गणातून प्रभाकर पवार विजयी वाई तालुका यशवंतनगर गट बापूसाहेब शिंदे – १९३५ मतांनी विजय (राष्ट्रवादी काँग्रेस) विक्रांत डाेंगरे – २७०९ मतांनी विजय (राष्ट्रवादी काँग्रेस) स्वप्निल गायकवाड – २४४१ मतांनी विजय (भाजप) कोंढवे गणातून महेश गाडे विजयी कोरेगाव तालुका पिंपोडे गट सतीश धुमाळ विजयी (शिवसेना) सोनके गण आकाश सोळसकर विजयी(राष्ट्रवादी काँग्रेस) पिंपोडे गण रूपाली साळुंखे विजयी (शिवसेना) हेही वाचा: India-Canada Meeting: भारताच्या ‘जेम्स बाँड’ची कॅनडाशी डील ; अजित डोभाल यांच्याकडून सुरक्षा करारावर शिक्कामोर्तब