सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांची करोनावर मात
Updated On:

सातारा (प्रतिनिधी)- सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व शिरवळ भागाचे नेते उदय कबुले यांनी करोनावर मात केली आहे. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिरवळसह जिल्हा परिषदेसाठीही सुखद दिलासा मिळाला आहे.
उदय कबुले यांच्या दोन मुलांसह पाचजण करोना बाधित झाले होते. अध्यक्षच करोना बाधित झाल्याने जिल्हा परिषदेसह खंडाळा तालुकाही हादरला होता. उदय कबुले यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांच्या मित्र परिवारात चिंतेचे वातावरण होते. मात्र उदय कबुले यांनी धीराने या संकटाचा सामना केला. कबुले यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यापूर्वीच करोनावर मात केली होती. शुक्रवारी उदय कबुले यांनीही करोनावर मात केली. शिरवळ येथे मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.





