सातारा: कार झाडावर आदळून युवक ठार
Updated On:

सातारा : चरेगाव (ता. कराड) गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर भोळेवाडी फाट्यानजीक शनिवारी (दि. ३०) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास कार झाडावर आढळल्याने युवक ठार झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज जालिंदर कुंभार (वय-३३ रा. उंब्रज) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
सूरच कुंभार पाटण-पंढरपूर राज्य मार्गावर चरेगाव गावचे हद्दीत भोळेवाडी फाट्याच्या पुढे कारवरील ताबा सुटल्याने झाडावर आढळून गंभीर जखमी झाला होता. त्यास अधिक उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. आज ३१जुलै रोजी पहाटे ४ च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.





